Manish Jadhav
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. मात्र, या दिवसांमध्ये चांगला आहार घेणे फार गरजेचे ठरते. पावसाळ्यात फळांचा आहार शरीरासाठी आरोग्यदायी ठरतो.
आज (17 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये कोणती फळे खावीत याविषयी जाणून घेणार आहोत...
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, पावसाळ्यात या फळाचे महत्त्व अधिक वाढत असते. फायबर आणि व्हिटामिनने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते.
लिची हे फळ पावसाळ्या दिवसांमध्ये आवर्जून खायला हवे. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा पुरेपूर साठा असते. हे फळ त्वचा सुधारण्यासोबतच रक्त वाढण्यासाठी मदत करते.
चेरी या फळाचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करणे चांगले समजले जाते. व्हिटॅमिन ए, बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअम युक्त असे हे फळ आहे.
पावसाळ्यात जरुर केळी खाल्ली पाहिजे. पचनक्रिया सुधारण्यास केळी मदत करते.