Sameer Panditrao
नुकतीच पुण्यात पूल कोसळण्याची दुर्घटना घडली. पूल धोकादायक आहे हे कसे ओळखाल?
जर पुलावरील लोखंडी रेलिंग, खांब किंवा गंजलेली फ्रेम असेल तर तो पूल कमकुवत असण्याची शक्यता असते.
पुलाच्या भागावर तडे, क्रॅक्स किंवा खचलेले ठिकाणं दिसत असतील, तर तो पूल धोक्यात आहे.
पूराच्या काळात पाण्याचा लोंढा आदळत असेल आणि पुलाला धक्के बसत असतील तर सांभाळा.
पूल ओलांडताना जर हालचाल जाणवत असेल, कंपन वाटत असेल, तर त्याची ताकद कमी झालेली असते.
पूलाच्या पायांभोवती झाडांचे ओंडके, गाळ, वाळू अडकलेली असेल आणि पिलरमध्ये झाडे उगवली असतील तर तो पूल कमकुवत आहे.
कोणत्याही ठिकाणी जाताना प्रशासनाचा इशारा लक्षात घ्या, स्थानिक पातळीवर माहिती मिळवा.