Manish Jadhav
फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात.
मात्र जेव्हा या फळांचा ज्यूस बनवला जातो तेव्हा त्यातील फायबर जवळजवळ संपून जातं आणि साखरेचे प्रमाण वाढतं.
आज (16 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या फळांचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर नाही ते जाणून घेणार आहोत...
संत्र्याचा ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, कारण त्यात फायबरचे प्रमाण खूप कमी असते.
आंब्याच्या ज्यूसमध्ये भरपूर नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
स्ट्रॉबेरीच्या ज्यूसमध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप लवकर वाढते.