Akshata Chhatre
रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील गाण्यांसोबतच 'दूध सोडा' सीनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गौरव गेराच्या एका डायलॉगने—"पीलो पीलो आलम सोडा"—या जुन्या पेयाला पुन्हा एकदा ग्लॅमर मिळवून दिले असून लोक ते ट्राय करण्यासाठी उत्सुक आहेत.
नावाप्रमाणेच हे पेय दूध आणि लेमन-लाईम सोड्याचे मिश्रण आहे. हे अतिशय रिफ्रेशिंग असून दमट हवेत शरीराला थंडावा देण्यासाठी ओळखले जाते.
हे पेय मूळचे व्हिक्टोरियन इंग्लंडमधील आहे. ब्रिटीश साम्राज्यासोबत हे पेय भारतात आले आणि फाळणीपूर्वीच्या पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
१९४७ नंतर पाकिस्तानात हे पेय 'रमजान'मध्ये इफ्तारसाठी मुख्य ड्रिंक बनले. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी याचा वापर केला जातो.
सोड्यामुळे दुधाचा जडपणा कमी होतो, ज्यामुळे ते पचायला हलके लागते. मात्र, दूध आणि सोड्याचे प्रमाण योग्य असणे चवीसाठी खूप महत्त्वाचे असते.
आजही जुनी दिल्ली, अमृतसर, लाहोर आणि कराचीमध्ये हे पेय आवडीने प्यायले जाते. 'धुरंधर'मुळे हा वारसा आता पुन्हा एकदा 'ट्रेन्डी' झाला आहे.