Sameer Amunekar
जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी असते, तेव्हा तिच्या मनात अनेक विचारांची गर्दी असते. अशा वेळी कोणीतरी त्याचं शांतपणे, न थांबता ऐकणं ही मोठी मदत ठरते. तुम्ही काही सल्ला देण्याआधी, फक्त त्याचं ऐका.
"काही नाही होईल", "सगळं ठीक होईल" असं म्हणणं काही वेळा योग्य वाटतं, पण या शब्दांनी त्याच्या भावना दुर्लक्षित होतात. त्याऐवजी, "हो, हे खूप त्रासदायक आहे", "तुझं दुःख समजू शकतो" असे शब्द वापरून त्याच्या भावनांना मान्यता द्या.
दुःखात असलेली व्यक्ती अनेकदा स्वत:ला एकटं करत असते. त्यावेळी तुम्ही त्याच्याजवळ राहणं, अगदी काही न बोलता एकत्र वेळ घालवणं खूप उपयोगी ठरतं.
"काही लागलं तर सांग" हे वाक्य फारच सामान्य झालंय. त्याऐवजी, "तुला बाजारात जायचं असेल तर मी घेऊन जाईन", "जेवण बनवायला आवडत नसेल तर मी काही करून आणतो" अशा ठोस आणि कृतीशील मदतीची ऑफर करा.
कधी कधी मित्राच्या दुःखाची तीव्रता अशी असते की त्याला मानसिक आरोग्य तज्ञांची गरज असते. अशा वेळी त्याला योग्य सल्ला देणं गरजेचं असतं.
कधी-कधी आपण उत्साहाने मित्राला “चल, बाहेर जाऊ या”, “हस ना थोडं!” असं म्हणतो, पण त्याचं मन त्यासाठी तयार नसेल. अशावेळी त्याच्यावर जबरदस्ती न करता त्याला वेळ द्या. त्याच्या गतीने तो सावरू दे.