Sameer Amunekar
पोटातील अॅसिड अन्ननलिकेत वर येत असल्याने डायफ्रॅमला (श्वसनपटलाला) त्रास होतो आणि उचकी सुरू राहते.
अल्सरमुळे पोटाच्या आतील आवरणाला सूज किंवा इजा होते, ज्याचा परिणाम डायफ्रॅमवर होऊन उचकी वाढते.
सिरॉसिससारख्या लिव्हरच्या आजारात पोटावर दाब वाढतो, ज्यामुळे सतत उचकी लागू शकते.
किडनी कार्यक्षमतेने काम करत नसल्यास शरीरातील रसायनांचे संतुलन बिघडते आणि त्याचा परिणाम उचकीवर होतो.
स्ट्रोक, ब्रेन ट्युमर किंवा मेंदूला इजा झाल्यास मज्जासंस्थेतील संदेशांमध्ये अडथळा निर्माण होऊन दीर्घकाळ उचकी लागू शकते.
न्यूमोनिया, प्ल्युरिसी किंवा फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यास डायफ्रॅमला त्रास होऊन उचकी सतत लागू शकते.
स्टेरॉइड्स, केमोथेरपी औषधे किंवा काही वेदनाशामके घेतल्यासही उचकी लांब काळासाठी येऊ शकते.