Sameer Panditrao
तोरणा जिंकल्यावर महाराजांनी झपाट्याने स्वराज्य वाढवण्यासाठी विचार सुरु केला.
दरम्यान आदिलशहाने कोंढाण्यावर मिया रहीम महंमदला पाठवले.
मिया रहीम आला तर रयतेला पुन्हा त्रास सहन करावा लागेल असे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले.
त्यांची आधीपासूनच कोंढाणा किल्ल्याकडे नजर होती.
त्यांनी कोंढाणा किल्ला मिळवण्याची जबाबदारी बापूजी मुद्गल देशपांड्याना सांगितली.
बापूजींनी हुशारीने गडकऱ्यांना फितवून मावळे गडावर घातले आणि लढाई न करताच गड ताब्यात घेतला.
मिया रहीम शिरवळहून कोंढाण्याला पोचेपर्यंत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला होता.