Fort Aguada: आशियातील सर्वात मोठं पाण्याचे टाकी अन् ७९ तोफांचा पहारा; जाणून घ्या गोव्यातील 'आग्वाद' किल्ल्याचा थरारक इतिहास!

दैनिक गोमन्तक डिजिटल

पोर्तुगीजांकडून किल्ल्याची निर्मिती

अग्वाद किल्ल्याची उभारणी पोर्तुगीज शासकांनी 1609 ते 1612 या काळात केली. डच (Dutch) आणि मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणांपासून गोव्याचे आणि मांडवी नदीचे रक्षण करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता.

Fort Aguada | Dainik Gomantak

'अग्वाद' नावाचा रंजक इतिहास

पोर्तुगीज भाषेत 'अग्वाद' (Aguada) याचा अर्थ 'पाणी' असा होतो. या गडावर गोड्या पाण्याचा एक मोठा नैसर्गिक झरा होता, जिथून समुद्रातून प्रवास करणारी जहाजे पिण्याच्या पाण्याचा साठा भरून घेत असत. त्यामुळे याला 'अग्वाद' नाव पडले.

Fort Aguada | Dainik Gomantak

आशियातील सर्वात मोठे पाण्याचे टाके

या किल्ल्याच्या पोटात एक महाकाय भूमिगत पाण्याचे टाके (Water Tank) आहे. या टाक्याची क्षमता तब्बल 23,76,000 गॅलन पाणी साठवण्याची होती. तत्कालीन काळात संपूर्ण आशिया खंडात जहाजांना पाणी पुरवणारी ही सर्वात मोठी व्यवस्था होती.

Fort Aguada | Dainik Gomantak

79 तोफांचा अभेद्य पहारा

हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत मजबूत आणि अभेद्य होता. शत्रूच्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी आणि समुद्रमार्गे होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी या किल्ल्यावर वेगवेगळ्या 79 तोफा तैनात करण्यात आल्या होत्या.

Fort Aguada | Dainik Gomantak--

आशियातील पहिले आणि प्राचीन दीपगृह

किल्ल्याच्या मध्यभागी 1612 मध्ये बांधलेले एक भव्य दीपगृह (Lighthouse) आहे. हे केवळ गोव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक मानले जाते. सुरुवातीला यात दर 7 सेकंदांनी प्रकाश पडण्याची व्यवस्था होती.

Fort Aguada | Dainik Gomantak

मराठ्यांचे शौर्य आणि अपूर्ण राहिलेली मोहीम

1739 मध्ये मराठ्यांनी गोव्यावर मोठी स्वारी केली होती. थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगीजांचे अनेक प्रांत जिंकले, परंतु अग्वाद किल्ला आपल्या प्रचंड तटबंदीमुळे आणि तोफांमुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला.

Fort Aguada | Dainik Gomantak

स्वातंत्र्यलढ्यातील 'सेंट्रल जेल'

पोर्तुगीज राजवटीच्या उत्तरार्धात या किल्ल्याचा वापर तुरुंग (Aguada Jail) म्हणून केला जाऊ लागला. भारताच्या आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नामवंत स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीज सरकारने याच ठिकाणी बंदी बनवून ठेवले होते.

Fort Aguada | Dainik Gomantak

ऐतिहासिक पर्यटनाचे मुख्य केंद्र

1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर हा किल्ला एक ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. आज या किल्ल्याची भव्य तटबंदी, जुना तुरुंग आणि दीपगृह पोर्तुगीजकालीन इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

Fort Aguada | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांचा 'दक्षिण दिग्विजय'

Maratha History | Dainik Gomantak
आणखी बघा