Sameer Panditrao
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात एक विस्मरणात गेलेला किल्ला आहे.
कासारदुर्ग हा प्राचीन महत्वाचा किल्ला आता झाडाझुडपात हरवला आहे.
या किल्ल्याला तिन्ही बाजूंनी नदीने वेढलेले आहे.
किल्ल्याच्या बाहेर मोठा खंदक आहे.
परिसरात शंभर वर्षांपूर्वी कासार लोकांची वसाहत होती, अशी माहिती मिळते.
किल्ल्याच्या परिसरात भातशेती केली जाते.
दुर्लक्षामुळे या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे.