Akshata Chhatre
सणासुदीला केवळ महागडी वस्तू देणे आता जुने झाले. २०२५ मध्ये लोक 'ब्रँड'पेक्षा त्या भेटीमागचा विचार आणि वेगळेपणाला जास्त महत्त्व देत आहेत.
५ लाखांहून अधिक किमतीच्या ६०% भेटवस्तू आता 'पर्सनलाइज्ड' श्रेणीतील आहेत. लोकांना आता "सर्वांसारखे" नाही, तर "स्वतःसारखे" खास गिफ्ट हवे आहे.
हाताने तयार केलेली मेकॅनिकल घड्याळे आणि नाव किंवा संदेश कोरलेले दागिने आता लोकप्रिय होत आहेत. हे केवळ गिफ्ट नसून पिढ्यानपिढ्या जपण्यासारखा वारसा आहे.
घरासाठी हाताने बनवलेले दिवे किंवा डिझायनरचे स्वाक्षरी असलेले फर्निचर आता लक्झरी गिफ्टिंगचा भाग बनले आहेत, कारण प्रत्येक वस्तू ही 'युनिक' असते.
वस्तूंऐवजी आता 'कस्टम ट्रॅव्हल एक्सपीरियन्स' दिला जात आहे. खासगी वाईन इस्टेटमधील वास्तव्य किंवा निवडक लोकेशनवरची सहल ही एक अविस्मरणीय भेट ठरतेय.
वेलनेस रिट्रीट्स आणि हेल्थ सप्लीमेंट प्रोग्राम्स गिफ्ट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. झोप आणि जीवनशैली सुधारण्यासाठी डिझाइन केलेले हे प्रोग्राम्स अधिक लोकप्रिय आहेत.
नवीन कलाकारांची पेंटिंग्स किंवा आर्ट पीस आता केवळ गुंतवणुकीसाठी नाही, तर देणाऱ्याची संवेदनशीलता आणि समोरच्याबद्दलचा आदर दाखवण्यासाठी दिले जात आहेत.