गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यासाठी आनंदाची बाब म्हणजे सध्या इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होतेय.
कोरोनाच्या महामारीमुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती, मात्र २०२२ पासून या संख्येत वाढ होत आहे.
उझबेकिस्तान, कझाकिस्तान, पोलंड, रशिया, यूके या देशांतून पर्यटक मोठ्या संख्येत राज्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.
गोवा सरकारकडून राबवलेल्या उपक्रमांमधून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपलीकडे असलेला गोवा, येथील खाद्यपदार्थ, लोकसंस्कृती पाहायला मिळणार आहे.
ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांच्या मते, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र दरवर्षी अंदाजे २५०० कोटी रुपयांचे योगदान देत आहे.
गोवा भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. राज्यात २.५ लाखांहून अधिक लोकं कामाला आहेत.
पर्यटन खात्याने आध्यात्मिक पर्यटनासाठी ‘एकादशी तीर्थ’ उपक्रम सुरू केला आहे.