Goa Tourism: गोवा आणि कोकण म्हणजे Brother from another Mother?

गोमन्तक डिजिटल टीम

काय फरक आहे?

पाहायला गेलं तर गोवा आणि कोकणात आपली बरीच गफलत होते. पण गोवा आणि कोकणात काय फरक आहे हे जाणून घेऊया...

भाषा

गोवा आणि कोकणात बरंच साम्य पाहायला मिळतं, मात्र गोव्यात बोलली जाणारी भाषा कोंकणी आणि कोकणात बोलली जाणारी भाषा मालवणी.

संस्कृती

गोव्यात आजही पोर्तुगीजांच्या काही खुणा पाहायला मिळतात, काही शब्द आणि खाण्या-पिण्यात आजही पोर्तुगीजांची संस्कृती पाहायला मिळते. कोकणात बऱ्यापैकी महाराष्ट्राचा ठसका आहे.

आंबे

गोवा आणि कोकणातला सर्वात मोठा फरक म्हणजे आंबे. गोव्यात मानकुराद आंबे प्रसिद्ध आहेत तर कोकणात हापूस.

दशावतर-रणमाले

कोकणात ज्याप्रकारे दशावतराचा खेळ रंगतो त्याच प्रमाणे गोव्यात रणमाले प्रसिद्ध आहे.

समुद्र किनारे

गोवा आणि कोकणात समुद्रांची कमतरता नाही. हे समुद्र किनारे पहिले की गोव्याला जावं की कोकणात असा प्रश्नच पडतो.

वेगळी गम्मत

समुद्राच्या कडेला असेलेल्या या दोन्ही भागांमध्ये स्वतःची अशी वेगळी गम्मत आहे जी अनुभवण्यासाठी त्या राज्यांना भेट द्यावीच लागते.

बीचेस, किल्ले, चर्च बघितलेत! पण गोवा आहे त्याहूनही खास; पहा कसा ते..

आणखीन बघा