Manish Jadhav
संसर्गाममुळे लोकांना अचानक सर्दी होते किंवा अनेकदा डोकेदुखी होते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
तुम्हालाही सायनसचा त्रास आहे का? जर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर त्याला बिलकुल हलक्यात घेऊ नका.
सायनसपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करु शकता, ज्यामुळे तुम्हाला या संसर्गापासून आराम मिळू शकतो.
लसूण शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. जर तुम्ही सायनसच्या समस्येने त्रस्त असाल तर लसूण तुम्हाला मदत करु शकतो.
आले हे श्लेष्मा पातळ करण्यास मदत करते, नाक आणि घशातून निचरा करणे सोपे करते. चहा, सूप किंवा भाज्यांमध्ये आल्याचा वापर करुन तुम्ही चव वाढवू शकता.
संत्री आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे सायनसपासून आराम मिळतो.