Manish Jadhav
बदलत्या काळानुसार लोक आपल्या आरोग्याबाबतही जागरूक होत आहेत. तसेच आहारात देखील आवश्यक बदल करत आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
पुरेशी झोप न मिळाल्यानं आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही अस्वास्थ्यकर पदार्थ खाणं टाळावं.
आज (3 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रात्री झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खावू नयेत यााबाबत जाणून घेणार आहोत.
रात्री झोपण्यापूर्वी सामान्य स्थितीत चॉकलेट (chocolate) आणि पेन किलर (pain killer) कधीही खाऊ नयेत.
रात्री झोपण्यापूर्वी टोमॅटो खाल्ल्याने देखील झोप खराब होऊ शकते. टोमॅटो खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो.
कांदा खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. कांद्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो, ज्यामुळे झोपेवर वाईट परिणाम होतो.