गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात माघारीच्या पावसाने जोरदार दणका दिला आहे. बऱ्याच ठिकाणी पडझड, रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार झाले आहेत.
वेर्णा - लोटली लिंक हमरस्त्यावर दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ दगड येऊन पडले.
सत्तरीत रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे पादचाऱ्यांची कसरत झाली तसेच अनेक वाहने अडकून बसली.
पेडणे मासळी बाजारात पावसाचे पाणी घुसल्याने विक्रेत्यांची धावपळ झाली तसेच मच्छीविक्रेत्यांची भांडी पाण्यावर तरंगू लागल.
तोरसे जवळील उड्डाण पुलावर पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना बरीच कसरत करावी लागली.
कदंब बसस्थानकापासून जवळ असणारा आंबेडकर उद्यान परिसर पावसाने जलमय झाला.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासमोरचा रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रुग्णांना बराच त्रास झाला. आसपास काही घरांत थोड्या फार प्रमाणात पाणी शिरले.