Sameer Amunekar
अनेकांना उशीरापर्यंत जागं राहण्याची सवय लागते आणि त्यामुळे झोपेच्या वेळेचा आणि आरोग्याचा बिघाड होतो. रात्री वेळेवर झोप येण्यासाठी आणि सकाळी ताजेतवाने उठण्यासाठी नाईट रूटीन सुधारणं गरजेचं आहे.
दररोज एकाच वेळेला झोपायचा प्रयत्न करा. त्यामुळं रोज वेळेवर झोपण्याची सवय लागेल.
झोपण्याच्या किमान 30-60 मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वापर थांबवा. ब्लू लाइटमुळे मेंदूला ‘जागं राहा’ असा सिग्नल मिळतो.
उशिरा किंवा जड जेवण केल्यास पचनावर परिणाम होतो आणि झोपेवर परिणाम होतो. शक्य असल्यास रात्री ८ वाजेपर्यंत जेवण उरकावे.
झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा डीप ब्रेथिंग केल्याने मन शांत होतं आणि झोप चांगली लागते.
रुममध्ये शांतता, मंद प्रकाश, योग्य तापमान ठेवा.