Sameer Amunekar
डुप्लिकेट चार्जर किंवा कमी गुणवत्तेच्या केबलमुळे चार्जिंगचा वेग कमी होतो. नेहमी ब्रँडच्या अधिकृत चार्जर आणि कनेक्टरचा वापर करा.
तुमच्या फोनला Fast Charging सपोर्ट आहे का, हे तपासा. जर फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल, तर योग्य वॉटचा (Watt) चार्जर वापरा.
गेम खेळणे, व्हिडीओ बघणे किंवा इंटरनेट ब्राउझिंग केल्यास चार्जिंगचा वेग कमी होतो. शक्य असल्यास फोन एअरप्लेन मोड मध्ये ठेवा.
फोन बंद करून चार्ज केल्यास, कोणताही बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी चालू नसल्यामुळे तो झपाट्याने चार्ज होतो. चार्जिंग पोर्ट स्वच्छ ठेवा
चार्जिंग पोर्टमध्ये धूळ किंवा कचरा अडकल्यास चार्जिंग नीट होत नाही. पोर्ट हळुवारपणे स्वच्छ करण्यासाठी सुई किंवा सॉफ्ट ब्रशचा वापर करा.
Settings → Battery Usage मध्ये जाऊन कोणत्या ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू आहेत, ते तपासा आणि बंद करा.