गोमन्तक डिजिटल टीम
गणेश चतुर्थीच्या आधी ऑगस्टमध्ये गोवेकरांना एका महत्वाच्या उत्सवाचे वेध लागतात. हा उत्सव कोणता आहे हे आपण जाणून घेऊ.
ऑगस्टमध्ये गोव्यात बोंदेरा हा सण जोरात साजरा होतो. पोर्तुगीज शब्द "बोंडेरस" ज्याचा अर्थ ध्वज होतो यावरून बोंदेरा हे नाव रूढ झाले.
भातशेती आणि भरपूर वृक्षसंपदेने नटलेल्या दिवाडी बेटावर हा उत्सव साजरा होतो. मांडवी नदी ओलांडून या बेटावरती जावे लागते.
या बेटावरील जमीन आणि मालमत्तेचे प्रश्न पोर्तुगीज काळात ऐरणीवर होते. सीमेसाठी भांडताना रंगीत झेंडे उभे करणे आणि एकमेकांचे झेंडे पाडण्याचे प्रकार इथे घडले.
या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या उत्सवात पारंपरिक फ्लोट परेड, फॅन्सी ड्रेसेस, ध्वज प्रदर्शन, पारंपरिक नृत्य, संगीत आणि सोबत चविष्ट गोवन खाद्यपदार्थ असतात.
ऐतिहासिक विवादांचा संदर्भ घेऊन हा उत्सव समुदायाला एकत्र आणतो. हा विविध कलांमधून रंगाची उधळण करणारा सांस्कृतिक देखावा आहे.
फोटाश ही एक मॉक गन आहे. या उत्सवात एकमेकांच्या झेंड्याना मैत्रीपूर्ण युद्धात लक्ष्य करण्यासाठी पूर्वी वापरत असत. आता ती झेंडा परेडमध्ये पाहता येते.
बोंदेरा ज्याला बॉन्ड्राम फ्लॅग कार्निव्हल असेही म्हणले जाते तो ऑगस्ट महिन्यात चौथ्या शनिवारी होतो. यावर्षीचा बोंदेरा २४ ऑगस्ट रोजी आहे.