Ganeshprasad Gogate
कफहारक म्हणजे कफ नाहीशी करणारी जी औषधे आहेत त्यात लवंग हे फारच मोठे औषध आहे.
खोकला येत असता नुसती तोंडात धरल्याने तो थांबतो, ढास लागली असता सारखे खोकून खोकून सुद्धा कफ पडत नाही अशा वेळी चार लवंगा चावून खाव्या, ठसका थांबतो, खोकला सुटतो.
दम्यास लवंगाइतके मोठे औषध नाही. सारखी लवंग तोंडात धरल्याने दमा लागत नाही.
भूक लागण्यास लवंगा उत्तम, लवंगांचे चूर्ण अदमासे १ ग्रॅम मधाबरोबर रोज सकाळी घेत गेल्यास, थोड्याच दिवसात उत्तम भूक लागते.
ओकारी, विशेषत: गर्भिणीची ओकारी लवंगेने नाहीशी होते. 1 ग्रॅम लवंगाचे चूर्ण डाळिंबाच्या रसातून दिल्याबरोबर गर्भिणीची उलटी थांबते असा अनुभव आहे.
लवंगाचे पाणी प्याल्याने तहान कमी होते. ताप आला असता अतिशय तहान लागते. त्यावेळी 1 लिटर पाण्यात चार लवंगा टाकून निम्मे करून ते पाणी पिण्यास देण्याची वहिवाट आहे. ह्याने तहान थांबते व दुसरे दोष वाढत नाहीत.