Sameer Panditrao
२६ जानेवारी १९५० रोजी भारत देशात पहिला प्रजासत्ताक दिन पार पडला.
गोव्यात मात्र यावेळी प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला नाही.
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला.
१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक बनला, परंतु भारतीय संघराज्याचा भाग झाल्यानंतर या उत्सवांमध्ये गोव्याचा समावेश सुरू झाला.
२६ जानेवारी १९६२ रोजी गोव्यात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले होते.
२६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.