Sameer Panditrao
२६ जानेवारीला आपण सर्व भारतीय मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करतो.
यानिमित्त्याने आपण प्रजासत्ताक दिनाविषयी फारशा माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ.
स्वातंत्र्यापूर्वी २६ जानेवारी १९३० रोजी पहिल्यांदा भारताचा पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता.
पहिला प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळल्यानंतर तीन वर्षांनी साजरा करण्यात आला होता.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तीन दिवस चालला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या परेडमध्ये १०० विमाने आणि तीन हजार सैनिक सहभागी झाले होते.
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे.