Akshata Chhatre
ऑनलाइन डेट करण्याच्या विचारात आहात का? हो तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे गोंधळ होणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा फोटो, आवडी-निवडी, आणि जीवनाबद्दल स्पष्ट लिहा.
ऑनलाइन डेट करताना एकाच वेळी १० लोकांशी गप्पा सुरू ठेवल्यास भावनिक गुंतवणूक होत नाही, त्यामुळे अधिक लोकांमध्ये गुंतू नका.
"हाय" किंवा "कशी आहेस?"असं म्हणून थांबू नका. त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधील एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्या, यामुळे तुमचा संपर्क वाढेल.
लाज वाटणं, संकोच होणं अगदी नॉर्मल आहे. सुरुवातीस तुम्ही चूक कराल, पण संवादातून आत्मविश्वास वाढतो.
कोणीतरी ‘नाही’ म्हणालं तर ते मनाला लावून घेऊ नका, कारण तुमचं मूल्य त्या उत्तरावर अवलंबून नाही.