Sameer Panditrao
१६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबईहून ठाण्याकडे पहिली लोकल ट्रेन धावली.
मुंबई (बोरीबंदर) येथून ठाण्याच्या दिशेने १४ डब्यांची ट्रेन निघाली. या ट्रेनमध्ये ४०० पेक्षा अधिक प्रवासी होते.
मुंबई ते ठाणे हे ३४ किमीचे अंतर ट्रेनने ५७ मिनिटांत पार केले.
पहिली लोकल "सुलतान", "सिंधू" आणि "साहिब" या तीन इंजिनांनी ओढली गेली होती. ही स्टीम इंजिन होती.
तेंव्हा तिला ‘लोकल ट्रेन’ म्हणत नव्हते, ती होती "प्रवासी रेल्वे".
३ फेब्रुवारी १९२५ रोजी सीएसटी (व्हीटी) ते कुर्ला दरम्यान पहिली इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू झाली.
आज मुंबई लोकल रोज ७० लाखांहून अधिक प्रवाशांचे आयुष्य सुसह्य करते.