Manish Jadhav
आजच्या धावपळीच्या जगात करिअरच्या संधी अफाट आहेत. या अफाट संधीमधून आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते पाहून प्रत्येकजण त्या संधीच्या दिशेने वाटचाल करतो.
आजच्या काळात प्रत्येकाला नवीन कौशल्य शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे. प्रत्यकेजण चांगल्या नोकरी मिळवण्यासाठी धडपडतोय.
पहिली नोकरी मिळणे हा करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि यात अनुभवासोबतच खूप काही शिकायला मिळते. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपण जोशमध्ये असतो, मात्र या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊया...
करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये वरिष्ठांचा सल्ला ऐकणे खूप महत्वाचा असतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कामामध्ये घाई करु नये. संयम बाळगावा, कारण कधी कधी घाईत चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
पहिली नोकरी तुम्हाला तुमचे नेटवर्क तयार करण्याची संधी देते.
नोकरीदरम्यान तुम्ही तुमच्या कार्यालयातील सर्वांशी संवाद साधला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकते.
नोकरीदरम्यान तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.
नोकरीदरम्यान तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून व्यवहारिक जगाबद्दलही जाणून घेता येते.
तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांकडून, वरिष्ठांकडून नव-नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याचबरोबर नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळते.
नोकरीदरम्यान तुम्ही तुमचे काम अगदी प्रामाणिकपणे केले पाहिजे. तुमची तुमच्या कामावर निष्ठा असली पाहिजे. कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रामाणिक कामामधून तुमची एक विश्वासार्ह प्रतिमा तयार होते, जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मदत करते.