Festive Glow Tips: सणासुदीला दिसा सर्वात वेगळे! दुर्गापूजेआधी चेहऱ्यावर नैसर्गिक आणि इन्स्टंट चमक आणणारे डॉक्टरांचे खात्रीशीर उपाय

Sameer Amunekar

भरपूर पाणी प्या

दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा. योग्य हायड्रेशनमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Instant face glow tips | Dainik Gomantak

योग्य क्लींजिंग, एक्सफोलिएशन

दिवसातून दोनदा सौम्य क्लींजरने (Mild Cleanser) चेहरा धुवा. तसेच, आठवड्यातून एकदा चेहरा एक्सफोलिएट करा जेणेकरून मृत त्वचा (Dead skin cells) निघून जाईल.

Instant face glow tips | Dainik Gomantak

मॉइश्चरायझरचा वापर

त्वचा आतून मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार (कोरडी, तेलकट किंवा मिश्र) योग्य मॉइश्चरायझर नियमितपणे लावा.

Instant face glow tips | Dainik Gomantak

सनस्क्रीन

बाहेर जातानाच नाही, तर घरात असतानाही किमान SPF 30+ असलेले सनस्क्रीन चेहऱ्याला लावा. हे त्वचेचे अतिनील किरणांपासून रक्षण करते आणि पिगमेंटेशन टाळते.

Instant face glow tips | Dainik Gomantak

व्हिटॅमिन सी सीरम

त्वचेचा रंग उजळण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर २-३ थेंब व्हिटॅमिन सी सीरम लावा.

Instant face glow tips | Dainik Gomantak

७ ते ८ तासांची शांत झोप

रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपेमध्ये त्वचेच्या पेशींची दुरुस्ती (Skin repair) होते, ज्यामुळे डार्क सर्कल्स आणि निस्तेजपणा दूर होतो.

Instant face glow tips | Dainik Gomantak

सकस आणि संतुलित आहार

तुमच्या रोजच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, आणि सुका मेवा (बदाम, अक्रोड) यांचा समावेश करा. जास्त साखर असलेले पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा.

Instant face glow tips | Dainik Gomantak

चेहऱ्यावर हवा हिमाचलच्या तरुणींसारखा नैसर्गिक ग्लो? घरच्या घरी करता येतील 'हे' सोपे उपाय

येथे क्लिक करा