Sameer Amunekar
हिमाचलमध्ये सफरचंद मुबलक प्रमाणात मिळतात. सफरचंदाचा गर किंवा पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचेला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि नैसर्गिक ग्लो येतो.
कच्च्या दुधात थोडे केशर मिसळून कापसाच्या साहाय्याने चेहऱ्याला लावा. हे नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळतो.
अक्रोडच्या पावडरमध्ये मध मिसळून नैसर्गिक स्क्रब तयार करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा (Dead Skin) निघून जाते आणि त्वचा मऊ व नितळ होते.
पहाडी भागात थंडीपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी तेलाचा वापर होतो. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे दोन थेंब घेऊन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.
हिमाचलच्या तरुणी त्यांच्या त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतात. त्वचेची चमक आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या.
चंदनाची पावडर आणि गुलाबजल एकत्र करून फेसपॅक बनवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी होतात आणि त्वचेला शांत, थंड प्रभाव मिळतो.
सौंदर्य हे आतून झळकते. रोजच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा, ज्यामुळे त्वचा आतून निरोगी राहील आणि चेहऱ्यावर तेज दिसेल.