Akshata Chhatre
बडीशेप ही स्वयंपाकघरात नक्कीच असते.
तुम्हाला माहिती आहे का दोन-अडीच फूट उंचीचे हे रोप भरपूर गुणकारी आहे.
जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेपेचा वापर केला जातो.
वारंवार पातळ शौचास होत असल्यास बडीशेप कुटून, त्यात थोडेसे तूप टाकून घेतल्याने फायदा होतो.
डोकं दुखत असल्यास तुपावर परतलेली बडीशेप डोक्याला लावल्याने आराम मिळतो.
पित्ताचा त्रास होत असल्यास मोरावळ्यासोबत बडीशेप खावी.
सततची पोटदुखी, गॅस, अपचन,पोट जाड वाटणे इत्यादी समस्यांवर बडीशेप रामबाण उपाय ठरते.