Sameer Amunekar
रात्री १ चमचा बडिशेप पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी प्यायल्याने पोट साफ राहते, पिंपल्स कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.
२ वेलची पूड + १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवा. त्वचा मऊ, उजळ आणि फ्रेश दिसते.
बडिशेप उकळून थंड करा व कापसाने चेहऱ्यावर लावा. हा नैसर्गिक टोनर त्वचेतील तेलकटपणा कमी करतो.
वेलची पूड + गुलाबजल डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. नियमित वापराने काळी वर्तुळे कमी होतात.
बडिशेप वाटून त्यात थोडे हळद घालून पिंपल्सवर लावा. सूज आणि लालसरपणा कमी होतो.
रात्री कोमट दुधात वेलची पूड मिसळून प्या. शरीर शुद्ध होते आणि त्वचेला आतून चमक येते.
बडिशेप पूड + बेसन + दूध एकत्र करून हलक्या हाताने स्क्रब करा. मृत त्वचा निघून चेहरा उजळतो.