Akshata Chhatre
काही लोक तुमच्या सोबत असूनही भावनिक दृष्ट्या मैलोन्मैल लांब असतात. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, असे तुम्हाला सतत जाणवते.
तुमचा जोडीदार केवळ वरवरच्या गोष्टींवर (काम, टीव्ही, हवामान) बोलतो का? जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल किंवा नात्यातील अडचणींवर बोलता, तेव्हा ते विषय बदलतात.
भावनिक दुरावा ठेवणारी व्यक्ती कधीही आपली चूक मान्य करत नाही. स्वतःला 'परफेक्ट' दाखवण्याच्या नादात ते स्वतःच्या कमकुवत बाजू कधीच समोर येऊ देत नाहीत.
जोडीदाराचे वागणे कधी खूप प्रेमाचे असते, तर कधी ते अचानक शांत होतात. हे 'हॉट अँड कोल्ड' वागणे म्हणजे जवळीक वाढल्यावर स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
"तू खूप जास्त विचार करतोयस" किंवा "हा तर नुसता ड्रामा आहे," असे म्हणून जर तुमच्या भावना फेटाळल्या जात असतील, तर तुमचा जोडीदार भावनिक जबाबदारी घेण्यास घाबरतोय.
आजारपण किंवा मानसिक ताण असलेल्या काळात जर तुमचा जोडीदार आधार देण्याऐवजी चिडचिड करत असेल किंवा पळ काढत असेल, तर हा एक मोठा 'रेड फ्लॅग' आहे.
जोडीदार भावनिक दृष्ट्या लांब असणे म्हणजे ते वाईट आहेत असे नाही, कदाचित ते स्वतःच कोणत्यातरी गोंधळात असतील. अशा वेळी मोकळेपणाने बोलणे हाच त्यावर उपाय आहे.