गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याचे खरे वैभव म्हणजे इथले विविध उत्सव आहेत जे गोवन लोक एकत्र येऊन साजरे करतात. आज आपण सेंट लॉरेन्स फीस्तची माहिती घेऊ.
मान्सून संपत आल्यावर हा उत्सव एक नवी सुरुवात असे मानून साजरा होतो. हा फीस्त १० ऑगस्ट रोजी साजरा होतो.
सिकेरी येथे समुद्राच्या विहंगम नजाऱ्यासह सेंट लॉरेन्स चर्चची वास्तू उभी आहे. १६३० मध्ये या वास्तूचे काम सुरु झाले होते.
सेंट लॉरेन्स खलाशी, मच्छीमार आणि स्वयंपाकी यांचे संरक्षक संत म्हणून ओळखले जातात जे रोमन चर्चच्या सात डिकनपैकी एक होते आणि तिसऱ्या शतकात ते शहीद झाले.
या उत्सवात सेंट लॉरेन्सच्या पुतळ्याची गावातून मिरवणूक काढतात. रंगांनी सजलेल्या या मिरवणुकीतला जल्लोष पाहण्यासारखा असतो.
या निमित्याने परंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांची रेलचाल असते. ग्रामस्थ अनेक खेळ खेळतात.
या निमित्याने खास गोवन गोडधोड पदार्थ बनतात. या मिठाईंचे लोकांच्यात वाटप केले जाते.
या फीस्तच्या निमित्याने चर्च आणि गावांमध्ये आकर्षक सजावट होते. गोवन पोशाखात लक्ष एकत्र येऊन मेजवानी करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.
गोव्यात परफ़ेक्ट रोमँटिक प्लेस शोधताय? मग या पॉईंटला नक्की भेट द्या!