गोमन्तक डिजिटल टीम
गोवा आणि फुटबॉल हे अतूट नाते आहे. गोव्यातील फुटबॉल क्लबकडून अनेक परदेशी खेळाडू मैदानात उतरले आहेत.
ड्रिबलिंगमध्ये निष्णात असा हा सर्बियन फुटबॉलपटू आता गोव्याकडून खेळणार आहे.
इंडियन सुपर लीग खेळणाऱ्या महत्वाच्या संघांपैकी एफसी गोवा हा संघ आहे. फुटबॉलप्रेमी या संघाचे चाहते आहेत.
२८ वर्षीय मध्यरक्षक देयान द्राझिच याच्याशी दोन वर्षांचा करार करण्यात आला. इतकी वर्षे तो युरोपमध्ये खेळत होता.
एफसी गोवाशी करार करण्यापूर्वी द्राझिच २०२३-२४ मोसमात सायप्रसमधील एथनिकोस अचना एफसीतर्फे खेळला होता.
आतापर्यंतच्या क्लब कारकिर्दीत द्राझिच याने ३२६ सामन्यांत ५४ गोल व ४८ असिस्टची नोंद केली आहे.
एफसी गोवा आणि द्राझिच हे समीकरण पाहायला फुटबॉल चाहते उत्सुक आहेत. ते सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी पाहा