Pranali Kodre
वेस्ट इंडिजने 3 डिसेंबर 2023 रोजी इंग्लंडविरुद्ध अँटिग्वा येथे झालेल्या वनडे मालितेतील पहिल्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या विजयात कर्णधार शाय होपने शतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 109 धावांनी नाबाद खेळी केली.
या खेळीसह शाय होपने वनडेत 5000 धावांचा टप्पा पार केला. त्याने 114 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या.
त्यामुळे शाय होपने सर्वात कमी डावात 5000 वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विवियन रिचर्ड्स आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे.
विवियन रिचर्ड्स आणि विराट कोहली या विक्रमाच्या यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज रिचर्ड्स यांनीही 114 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच विराट कोहलीनेही वनडेत 114 डावात 5000 धावा पूर्ण केल्या.
वनडेमध्ये सर्वात कमी डावात 5000 धावा करण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 97 डावात 5000 वनडे धावा केल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला आहे. त्याने 101 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.