Pranali Kodre
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात नुकतीच 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत श्रीलंकेने 2-1 फरकाने विजय मिळवला.
या मालिकेदरम्यान श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट कारकिर्दीत 100 विकेट्सचा टप्पा पार केला.
त्याने या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात म्हणजेच त्याच्या कारकिर्दीतील 63 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केल.
त्यामुळे हसरंगा सर्वात कमी सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
सर्वात कमी सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणाऱ्या पुरुष गोलंदाजांच्या यादीत हसरंगाच्या पुढे अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशीद खान असून त्याने 53 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 100 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा मार्क एडेर आहे. त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने त्याने 76 सामन्यांत आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा इश सोधी असून त्याने 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या.