Pranali Kodre
रणजी ट्रॉफी 2023-24 रायपूरला आसाम आणि छत्तीगढ या संघात सामना झाला. या सामन्यात छत्तीसगढने 10 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले, तरी आसामचा कर्णधार रियान परागने आक्रमक शतक करत एक मोठा विक्रम नावावर केला.
आसामकडून दुसऱ्या डावात रियानने 56 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळ कायम करत 87 चेंडूत 11 चौकार आणि 12 षटकारांसह 155 धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रियान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर ऋषभ पंत आहे. पंतने 2016 च्या हंगामात दिल्लीकडून झारखंड विरुद्ध 48 चेंडूत शतक केले होते.
तिसऱ्या क्रमांकावर नमन ओझा असून त्याने मध्यप्रदेशकडून कर्नाटकविरुद्ध २०१५ साली ६९ चेंडूत शतक केले होते.
चौथ्या क्रमांकावर एकलव्य द्विवेदी असून त्याने २०१५ साली उत्तरप्रदेशकडून रेल्वेविरुद्ध ७२ चेंडूत शतक केले होते.
पाचव्या क्रमांकावरही पंत असून त्याने 2016 च्या हंगामात दिल्लीकडून झारखंड विरुद्धच ८२ चेंडूत शतक केले होते.
केएस भरतने आंध्र प्रदेशकडून गोवा विरुद्ध २०१५ साली ८६ चेंडूत शतक केले होते.