Sameer Amunekar
उन्हाळ्यासाठी स्टायलिश फुटवेअर घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात पायांना आराम मिळणं आणि स्टाइल टिकवणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. खाली काही टिप्स दिल्या आहेत.
लेदर, कॅनव्हास किंवा मेश सारख्या मटेरियलचे शूज निवडा जे पायांना हवा खेळू देतात.
उन्हाळ्यात जास्त चालणं होतं, त्यामुळे चांगला कुशन असलेला सोल निवडणं गरजेचं आहे.
पाय मोकळे राहिले की घाम कमी येतो आणि फ्रेश वाटतं. फ्लॅट सँडल्स, स्लिपर्स, किंवा ओपन-टो सॅन्डल्स उत्तम पर्याय असतात.
उन्हाळ्यात जड शूज घातले की त्रास होतो. त्यामुळे लाइटवेट आणि फ्लेक्सिबल शूज वापरावेत.
उन्हाळ्यात घामामुळे शूज स्लिप होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या ग्रिपसह सोल असलेले शूज घ्या.