Sameer Amunekar
सतत बसून राहिल्यास पाठीच्या कण्यावर ताण येतो. तसंच मान आणि खांद्यांमध्ये वेदना होतात.
शारीरिक हालचाल न केल्यामुळे कॅलोरी खर्च कमी होते, ज्यामुळे वजन वाढू शकते. यामुळे स्थूलतेसह अनेक इतर आजारांची शक्यता वाढते.
जास्त वेळ बसल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.
शारीरिक हालचाल केल्याने मानसिक तणाव कमी होतो, पण सतत बसून राहिल्यास चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक समस्याही वाढू शकतात.
एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने उच्च रक्तदाब (Hypertension) होण्याचा धोका वाढतो. हे शरीरातील रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम करतं.
एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्यास व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे दर तासाला ५-१० मिनिटे चालणं किंवा स्ट्रेचिंग करा.