गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत आणि इथे नवरात्रोत्सव सुद्धा आनंदाने साजरा केला जातो.
फोंडा तालुक्यातील केरी या गावात असलेलं श्री. विजयादुर्गेचं मंदिर अनेकांचं श्रद्धास्थान आहे.
या मंदिराची निर्मिती वर्ष १५६० मध्ये करण्यात आली होती आणि आजही मंदिराच्या भिंतीवर कावी चित्रकला पाहायला मिळते.
मंदिराच्या समोर एक भव्य दीपस्तंभ आहे तर मागच्या बाजूला गार पाण्याची सुंदर नदी वाहते.
या मंदिरात नवरात्रीशिवाय जयांची पूजा, रामनवमी, शिवरात्र, मंदिराचा वर्धापनदिन असे अनेक उत्सव साजरे केले जातात. विजयादुर्गेच्या देवळात नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात साजरं केलं जातं आणि त्यावेळीच देवीचा मखरोत्सव असतो.
शांत ठिकाणी वसलेला हा भलामोठा परिसर केवळ शरीरालाच नाही तर मनाला देखील प्रफुल्लित करतो.
तुम्ही जर का या मंदिराला भेट देणार असाल तर इथे भोजनालयात तुमच्या खाण्या-पिण्याची सोय केली जाते, आणि राहायचे असल्यास मात्र मंडळाची परवानगी आवश्यक आहे.
मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक सुरू होतो तर संध्याकाळी ८ वाजता तुम्ही आरतीचा लाभ घेऊ शकता. मंदिरात दर पाक्षिक दशमीला पालखीचा उत्सव असतो.