Sameer Amunekar
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोलीचे नाव घेताच निसर्गप्रेमींच्या मनात डोंगर-दऱ्यांतून वाहणारे धबधबे, धुक्याची चादर, हिरवळ आणि गारठा यांची रम्य चित्रे उमटतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या थंड हवेच्या ठिकाणात असलेल्या बाबा धबधब्याची खास ओळख आहे.
बाबा धबधबा आता केवळ स्थानिकांचे नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचेही आकर्षणकेंद्र बनले आहे.
बाबा धबधबा आंबोली गावाच्या मुख्य चौकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा अधिकच जलदगतीने कोसळतो आणि पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतो.
धबधब्याच्या परिसरात डोंगरकड्यावरून खाली पडणारे पाणी, त्याचा आवाज, आणि सभोवताली पसरलेली गर्द झाडी हे सगळं वातावरण मंत्रमुग्ध करणारं असतं.
बाबा धबधबा पाहण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत योग्य मानला जातो. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम आहे.