Sameer Panditrao
आशिष नेहरा हा माजी भारतीय गोलंदाज आहे.
गुजरात टायटन्स या IPL संघाचा नेहरा प्रमुख कोच आहे.
नेहरा IPl मध्ये कोच म्हणून प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.
मॅच सुरू असताना तो सतत सीमारेषेजवळ थांबून उत्साहाने सूचना करताना, येरझाऱ्या मारताना दिसतो.
उलटी टोपी घालून तो सतत उभाच दिसतो, यावरून बरेच मिम्स, जोक्स आले होते.
इतर मंडळी महागडी कोल्ड्रिंक्स, प्रोटीन शेक पित असताना तो नारळपाणी पिताना दिसतो.
टीम विजय झाल्यावर तो त्याच्या खास शैलीत खेळाडूंचे अभिनंदन करताना दिसतो.