गोमन्तक डिजिटल टीम
हॅवलॉक आयलंडवरील हा बीच अनेक वेळा आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जातो. त्याचा पांढरा मऊ वाळूचा किनारा आणि निळसर पाणी पर्यटकांना मोहवतं.
त्रिवेंद्रमजवळील हा बीच आपल्या सुंदर सूर्यास्त दृश्यांसाठी आणि आयुर्वेदिक स्पा साठी ओळखला जातो. लाइटहाऊस बीच आणि हव्वा बीच हे याच परिसरातले प्रसिद्ध भाग आहेत.
चेन्नईतील हा बीच भारताचा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे चालण्याचा आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो.
दक्षिण गोव्यातील हा स्वच्छ आणि शांत किनारा निसर्गप्रेमी आणि योगसाधकांसाठी प्रसिद्ध आहे.
धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हा बीच त्याच्या शांततेमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. ओम बीच आणि कुडले बीच हे इथले प्रमुख आकर्षण आहेत.
भगवान जगन्नाथ मंदिराजवळील हा बीच वार्षिक रथयात्रेच्या वेळी भाविक आणि पर्यटकांनी गजबजलेला असतो. सुर्योदयाचे अप्रतिम दृश्य येथे पाहायला मिळते.