Sameer Amunekar
ऑफिसमध्ये गोड नातं असलं तरी त्याचा उघड प्रदर्शन टाळा. सहकाऱ्यांना ते गैरसोयीचं वाटू शकतं.
प्रोफेशनल जबाबदाऱ्या बाजूला ठेवून रिलेशनशिपला प्राधान्य दिल्यास तुमच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
नातं लपवणं आणि खोटं बोलणं यामध्ये फरक आहे. विश्वासू मित्रांना माहिती देणं चालेल, पण अफवा टाळा.
बाह्य नजरा तुमचं निरीक्षण करत असतात. सतत एका टीममध्ये किंवा ब्रेकमध्ये एकत्र राहिल्यास चर्चांना ऊत येतो.
नातं तुटल्यास भावनांवर नियंत्रण ठेवा. राग, दुःख ऑफिसमध्ये व्यक्त करू नका. कामावर त्याचा परिणाम होऊ नये.
अशा नात्यांमुळे पक्षपाती वागणुकीचा आरोप होऊ शकतो. इमेज खराब होण्याची शक्यता अधिक असते.
तुमचं नातं चर्चेचा विषय होऊ नये म्हणून इतर सहकाऱ्यांशी सावध राहा. कोणत्याही अफवांना थारा देऊ नका.