Akshata Chhatre
बेडवर पडल्यापासून झोप येईपर्यंतचा वेळ तुमच्या शरीराच्या अंतर्गत थकव्याचे आणि मानसिक स्थितीचे मोजमाप असते.
हे अतिथकव्याचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा शरीर थकव्यामुळे अचानक 'शट डाऊन' होते, जे सामान्य नाही.
जर तुम्हाला झोपायला १५ ते २० मिनिटे लागतात, तर याचा अर्थ तुमची 'इंटरनल क्लॉक' उत्तम आहे आणि तुमचे शरीर नैसर्गिकरीत्या रिलॅक्स होत आहे.
जर तुम्हाला झोपण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असेल, तर हे वाढता ताण, चिंता किंवा चुकीच्या आहार-विहाराचे संकेत असू शकतात.
रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्यामुळे मेंदूला 'दिवस आहे' असे वाटते, ज्यामुळे झोप येण्याची नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत होते.
दररोज झोपण्याची एकच वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल आणि टीव्हीपासून लांब राहा.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा हलका व्यायाम करा. जेव्हा तुम्ही स्ट्रेस-फ्री व्हाल, तेव्हा झोपेची गती आपोआप सुधारेल.