फेस वॉश करूनही त्वचा निस्तेज दिसतेय? चेहरा धुण्याची 'ही' साधी ट्रिक तुमची त्वचा चमकावेल!

Sameer Amunekar

पाण्याचे तापमान

चेहरा धुण्यासाठी कधीही अति गरम पाण्याचा वापर करू नका. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा, ज्यामुळे छिद्रे (Pores) मोकळी होतात.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

६० सेकंदांचा नियम

अनेकजण काही सेकंदातच चेहरा धुवून मोकळे होतात. मात्र, फेस वॉशमधील घटकांना त्वचेवर काम करण्यासाठी किमान ६० सेकंद हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

फेस वॉशची निवड ओळखा

तुमची त्वचा कोरडी (Dry) असेल तर 'क्रीमी' फेस वॉश निवडा आणि तेलकट (Oily) असेल तर 'जेल बेस्ड' फेस वॉश वापरा. चुकीच्या उत्पादनामुळे त्वचा अधिक निस्तेज दिसू शकते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

हातांची स्वच्छता

चेहरा धुण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. अस्वच्छ हातांनी चेहरा धुतल्यास हातांवरील बॅक्टेरिया चेहऱ्यावर पसरतात आणि पिंपल्सची समस्या वाढते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

डबल क्लिंझिंग

जर तुम्ही मेकअप किंवा सनस्क्रीन लावत असाल, तर रात्री झोपण्यापूर्वी 'डबल क्लिंझिंग' करा. आधी ऑईल-बेस्ड क्लिन्झर आणि नंतर रेग्युलर फेस वॉश वापरल्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

टॉवेलने चेहरा चोळू नका

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने जोरात घासून पुसण्याची चूक करू नका. मऊ टॉवेलने चेहरा हलक्या हाताने 'डॅप' (Dap) करून सुकवा, जेणेकरून त्वचेवर रॅशेस येणार नाहीत.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

चेहरा धुतल्यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी होईपर्यंत थांबू नका. त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावा. यामुळे ओलावा त्वचेत टिकून राहतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

तणावमुक्तीसाठी 'हे' आहे झोपेचे साधे पण प्रभावी गणित

Stress management | Dainik Gomantak
येथे क्लिक करा