S Jaishankar: ''भारताला UNSC चे स्थायी सदस्यत्व मिळणार, पण...''

Manish Jadhav

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. भारत सातत्याने स्थायी सदस्यत्वासाठीचा दावा सांगत आला आहे. यातच आता, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

UNSC | Dainik Gomantak

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही भारताला निश्चितपणे UNSC चे स्थायी सदस्यत्व मिळेल असे म्हटले आहे. मात्र, यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

S Jaishankar | Dainik Gomantak

भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व निश्चितपणे मिळेल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले. भारताला हे सदस्यत्व नक्कीच मिळायला हवे, अशी भावना जगात आहे, मात्र यावेळी देशाला त्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.

S Jaishankar | Dainik Gomantak

जयशंकर म्हणाले...

गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. यादरम्यान, उपस्थितांनी त्यांना UNSC चा कायमस्वरुपी सदस्य होण्याच्या भारताच्या संधींबद्दल विचारले. यावर जयशंकर म्हणाले की, ''संयुक्त राष्ट्राची स्थापना सुमारे 80 वर्षांपूर्वी झाली होती.

S Jaishankar | Dainik Gomantak

जयशंकर पुढे म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, ''त्यावेळी जगात एकूण सुमारे 50 स्वतंत्र देश होते, जी संख्या कालांतराने सुमारे 193 पर्यंत वाढली.'' जयशंकर पुढे असेही म्हणाले की, "पण या पाच देशांनी आपले नियंत्रण कायम ठेवले. मात्र आता, तुम्हाला त्यांना या बदलाबाबत संमती देण्यास सांगावे लागेल.''

S Jaishankar | Dainik Gomantak

भारताच्या कायम सदस्यत्वासाठी काही देश सहमत

जयशंकर पुढे असेही म्हणाले की, ''भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी काही देश सहमत आहेत, तर काही जण प्रामाणिकपणे त्यांचे मत व्यक्त करत आहेत, तर काही देश असेही आहेत जे पाठीमागून सतत काहीतरी करत राहतात

S Jaishankar | Dainik Gomantak

जयशंकर यांनी विश्वास व्यक्त केला

भारत, जपान, जर्मनी आणि इजिप्त या देशांनी मिळून संयुक्त राष्ट्रासमोर एक प्रस्ताव मांडला असून यामुळे हे प्रकरण थोडे पुढे सरकेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

S Jaishankar | Dainik Gomantak

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य देश

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांकडे आहे.

UNSC | Dainik Gomantak