Akshata Chhatre
दही आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे, पण 'रात्री दही खावे की नाही' या प्रश्नावर अनेक मतभेद आहेत.
तज्ज्ञांनुसार दही हे वेळेनुसार योग्य अन्न आहे; म्हणजेच ते कसे आणि कशासोबत खाल्ले जाते, यावर त्याचे फायदे अवलंबून आहेत.
जेवणानंतर दही घेतल्यास ते प्रोबायोटिक्समुळे पचन सुरळीत ठेवते आणि पोटात जळजळ किंवा फुगण्याचा त्रास कमी करते.
रात्री शरीराची पेशी दुरुस्ती चालू असते. दह्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस या वेळी हाडांच्या पुनर्निर्मितीस मदत करतात.
दह्याचा थंड गुणधर्म संतुलित ठेवण्यासाठी त्यात काळी मिरी, मेथी किंवा जिरे टाकून खा. यामुळे सर्दीचा त्रास होत नाही आणि पचनही सुधारते.
दह्यातील 'गुड बॅक्टेरिया' आतड्यांचे आरोग्य सुधारतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि गाढ झोप लागते.
साधे दही (साखर/मीठ न घालता) रूम टेम्परेचरवर आणून रात्री सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.