Sameer Amunekar
थायरॉईड हार्मोन जास्त प्रमाणात तयार झाल्यास शरीरातील चयापचय वाढतो आणि जास्त घाम येतो.
रक्तातील साखर कमी (Hypoglycemia) किंवा जास्त झाल्यास जास्त घाम येऊ शकतो.
हृदयाशी संबंधित समस्या, विशेषतः हार्ट अटॅकच्या आधी किंवा दरम्यान, अचानक घाम येण्याचे लक्षण दिसू शकते.
काही मज्जासंस्थेच्या आजारांमुळे घाम नियंत्रित करणारी प्रक्रिया बिघडते.
महिलांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान गरम होणे (Hot Flashes) व घाम येणे सामान्य असते.
क्षय (TB), मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन यामध्ये रात्री जास्त घाम येतो.
काही अँटीडिप्रेसंट्स, वेदनाशामक किंवा रक्तदाब नियंत्रण औषधे घाम वाढवू शकतात.