Manish Jadhav
संध्याकाळी शरीराचं तापमान वाढलेलं असतं, त्यामुळे स्नायू अधिक लवचिक होतात. त्यामुळे व्यायाम करताना इजा होण्याचा धोका कमी असतो.
अनेक संशोधनानुसार संध्याकाळी व्यायाम केल्यास स्नायूंमध्ये ऊर्जा आणि सहनशक्ती जास्त असते. त्यामुळे वर्कआउट अधिक प्रभावी ठरतो.
दिवसभराच्या कामानंतर व्यायाम केल्याने मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि मूड ताजातवाना होतो. हे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे.
संध्याकाळी हलका ते मध्यम व्यायाम केल्यास शरीरातील थकवा संतुलित होतो आणि रात्री झोप अधिक खोल आणि आरामदायी होते.
संध्याकाळच्या वर्कआउटनंतर शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
अनेकांना सकाळी लवकर उठणं अवघड जातं, पण संध्याकाळी ऑफिसनंतर किंवा अभ्यासानंतर व्यायाम करणे अधिक सोयीचं ठरतं. त्यामुळे सातत्य ठेवणं सोपं होतं.
जिम, रनिंग ग्रुप किंवा मित्रांसोबत वर्कआउट केल्याने व्यायाम मजेशीर होतो आणि सामाजिक संबंधही मजबूत होतात.