Sameer Amunekar
सफरचंद खाल्याने पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात मदत करते. हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सफरचंद उपयुक्त आहे.
केळीमुळे पचन सुधारण्यास मदत होते. केळी हृदयासाठी उपयुक्त ठरतात, कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते.
संत्री शरीराला भरपूर व्हिटॅमिन C मिळवून देते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्वचेला चमकदार ठेवण्यासाठीही संत्री फायदेशीर ठरते.
फळांचा राजा आंबा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. आंबा अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
पपई पचनासाठी उपयुक्त कारण त्यात पपेन नावाचे एन्झाइम असते. पपई खाल्याने चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे फळ डिटॉक्ससाठी उपयुक्त असते.
द्राक्षांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच शरीरातील अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवते.
अननस पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. हाडांच्या हे फळ खूप आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या फळामुळे जुन्या आणि खाेल जखमा बऱ्या होण्यास मदत होते.