Sameer Amunekar
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सयुक्त आहार घ्या. दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या, ज्यामुळे त्वचा आणि पचनसंस्था निरोगी राहील.
दररोज ३० मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग, योगा किंवा व्यायाम करा. मसल्स टोनिंगसाठी हलक्या वजनाचे व्यायाम करा आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी ध्यान करा.
सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि नैसर्गिक तेलं वापरून त्वचेची काळजी घ्या. केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित तेल लावणे आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे.
दररोज स्वच्छता राखा, योग्य कपडे निवडा आणि स्वच्छता उत्पादने वापरा. हेल्थ चेकअप करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्वतःच्या उत्पन्नाचा स्त्रोत असावा आणि बचत करण्याची सवय लावा. महिला सुरक्षेबाबत जागरूक राहा, सुरक्षित प्रवास आणि स्वसंरक्षणाचे ज्ञान ठेवा.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचारांचा सराव करा. तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या, आवडते छंद जोपासा.