मुलांच्या मनातील खोल जखम! पालकांचे 'हे' शब्द त्यांना आयुष्यभर दुखावतात

Akshata Chhatre

प्रेम आणि काळजी

हे खरं आहे की प्रेम आणि काळजीपोटी बोललेले काही अनवधानाने केलेले शब्द तुमच्या मुलांच्या मनात एक खोल जखम सोडून जाऊ शकतात.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

मुलांची शांतता

मुलांची शांतता अनेकदा त्यांची नाराजी नव्हे, तर त्यांच्या मनातील अशी वेदना असते जी ते व्यक्त करू शकत नाहीत.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

मुलांचा आत्मविश्वास

पालकांना वाटतं की या किरकोळ गोष्टी आहेत, पण त्या मुलांच्या आत्मविश्वासावर आणि भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

"तुझ्यापेक्षा किती चांगला"

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी करता, तेव्हा त्यांना वाटतं की त्यांना नेहमी दुसऱ्या कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करावा लागतोय.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

भावना

अनेकदा मुलांना त्यांच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाहीत. अशावेळी तुम्ही त्यांना बोलण्याची तमीज नाही असे म्हटल्यास, त्यांच्या मनात भीती बसते, यामुळे ते गप्प राहू लागतात.Dainik Gomantak

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

का रडतोय?

मुलांसाठी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व भावना महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्या भावनांना 'छोटं' म्हणून नाकारता, तेव्हा त्यांना वाटतं की त्यांची समस्या कोणीही समजू शकत नाही.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

अपूर्ण इच्छा

अनेक पालक नकळतपणे त्यांच्या अपूर्ण इच्छा किंवा स्वप्नांचा भार मुलांवर टाकतात. असे बोलल्यास, मुलांना वाटतं की ते तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणारे मशीन आहेत.

parenting tips |words impact children | Dainik Gomantak

'ती' मोठी होताना... वडिलांनी मुलीला द्यायलाच हव्या 'या' महत्त्वाच्या शिकवणी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखीन बघा